
दिल्लीकरून अमेरिकेसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानात शुक्रवारी रात्री विचित्र घटना घडली आहे. पॅसेंजर एरियात चक्क वटवाघूळ आढळल्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. अखेर पायलटने एअर ट्रफिक कंट्रोलला सूचना देत दिल्ली विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.
एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AL 105 DEL-EWR या विमानाने शुक्रवारी रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून न्युजर्सीसाठी उड्डाण घेतले. त्यानंतर जकळपास अर्ध्या तासाने पॅसेंजर केबिनमध्ये वटवाघूळ आढळल्याने प्रकाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर पायलटने विमान माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. पहाटे 3.55 काजता दिल्ली विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यानंतर वटवाघळाला बाहेर वाढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱयांना बोलावण्यात आले. त्यांना विमानात धूर करावा लागला. त्यानंतर वटवाघूळ आढळले, परंतु ते मेलेले होते.
z या घटनेची माहिती मिळताच डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक उड्डाणापूर्की विमानाची तपासणी केली जाते. मगच उड्डाणाला परवानगी दिली जाते. या प्रकरणी ग्राउंड स्टाफचा निष्काळजीपणा समोर आला आहे.





























































