
आज दिल्ली बंद आहे. सर्व रस्ते, दुकाने बंद आहेत असे सांगत जॉर्ज वेनमिटर या अमेरिकन नागरिकाला एका कॅब चालकाने तब्बल 90 हजार रुपयांचा गंडा घातला.
या कॅब चालकाला इतर कॅब चालकांनीही साथ दिली. दिल्ली बंद आहे. त्यामुळे तुम्हाला आग्रा, जयपूरमध्ये हॉटेल बुक करावे लागेल असे सांगत एका बनावट ट्रॅव्हल एजन्सीमध्ये या अमेरिकन नागरिकाला नेण्यात आले. तिथे जयपूर आणि आग्र्यात हॉटेल बुक करण्यात आले. जॉर्ज जेव्हा जयपूरला गेले तेव्हा तिथे कुठेच त्यांच्या नावाने हॉटेलमध्ये बुकिंग नसल्याचे त्यांना आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे.
























































