दिल्लीत बसमध्ये तरुणीचा बिकिनी घालून प्रवास

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणाऱया महिला-पुरुषांची देशात कमी नाही. मेट्रो, रेल्वे स्टेशनवर स्टंट केलेले व्हिडीओ याआधी व्हायरल झाले आहेत. आता दिल्लीत एका महिलेने बिकिनी घालून बस प्रवास केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये बसमधील प्रवाशांच्या प्रतिक्रियादेखील पाहायला मिळत आहेत. बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱया महिलेला पाहून काहींना धक्का बसला आहे.