
डिलीव्हरी बॉयने पार्सलमधील आयफोन चोरी करून त्यात डमी फोन ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी डिलीव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी येथे एक कुरीअर कंपनी असून त्या कंपनीचा एका ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीसोबत पार्सल कुरीअरबाबत करार झाला आहे.
कंपनीने एका डिलीव्हरी बॉयला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही पार्सल दिले होते. त्यातील काही पार्सल रद्द झाल्याने ते कंपनीत जमा झाले होते. नुकतेच कंपनीने त्या पार्सलची तपासणी केली. तेव्हा त्या पार्सलमधून चार आयफोन गायब असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. आयफोन चोरीप्रकरणी कंपनीने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी डिलीव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
































































