केस मिटविण्यासाठी मागितली 50 लाखांची खंडणी; दोघांवर गुन्हा दाखल

केस मिटवायची असल्यास दोन दिवसांत 50 लाख रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांनाही केसमध्ये अडकवतो, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा अवधूत चव्हाण आणि सचिन जाधव (रा. संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैजयंती भुताळे (वय 47, रा. दळवीनगर, नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजयंती कुटूंबीयासह नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्यांच्याविरूद्ध एक गुन्हा दाखल आहे. संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी आरोपी मीरा यांनी सचिनला वैजयंती यांच्या घरी पाठविले आणि त्यांच्याकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या