देवनार डंपिंगमधील घुसखोरी थांबणार, सीसीटीव्हीसह आता सुरक्षा रक्षकांना डिजिटल वॉकीटॉकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवनार डंपिंग ग्राऊंडवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार असून सुरक्षा रक्षकांना डिजिटल वॉकीटॉकीही देण्यात येणार आहे. शिवाय परिसरात पक्का रस्ताही बांधण्यात येणार आहे.

देकनार डंपिंगवर नेहमीच घुसखोरांची समस्या असते. कचऱयातील भंगार जमा करण्यासाठी काही जण घुसखोरी करतात. यावरून अनेक वेळा हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे पालिका कर्मचाऱयांवरही हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आगी लागण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे पालिकेने या ठिकाणची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देवनार डंपिंगकर पालिका आता कचऱयापासून कीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहे. यात दररोज 600 मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचबरोबर इतरही कचरा आणण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने डंपिंग ग्राऊंडच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व कामांसाठी पालिका सुमारे 27 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबत पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

15 ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार

  • डंपिंग ग्राऊंडमधील वजनकाटा, प्रवेशद्वारासह इतर ठिकाणी 15 सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे घुसखोरांना जरब बसणार असून आगीसारख्या घटना घडत असल्यास त्याची तीक्रता वाढण्याआधीच उपाययोजना करता येणार आहे.
  • तर डिजिटल वाॅकीटॉकीमुळे सुरक्षा रक्षाकांना विनाअडथळा संवाद साधता येणार आहे. तर रस्त्याच्या कामात डंपिंग ग्राऊंडच्या परिसरात अडीज किलोमीटरचा पक्का रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना गस्त ठेवणेही अधिक सोप्पे होणार आहे.