डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला पॅरोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला एक महिन्याचा पॅरोल मिळाला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून आज सकाळी तो तुरुंगातून बाहेर पडला. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशमधील बागपत आश्रमात राहणार आहे. बागपतच्या बर्नावा गावात हा आश्रम असून राम रहीमचा पॅम्प असेल. या आधी हरयाणा सरकारने फेब्रुवारीमध्ये त्याला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. दोन महिला शिष्यांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सीबीआयने त्याला 2017 साली शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही त्याला शिक्षा झाली आहे.