देवळाच्या कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन मशीनची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असून ऑक्सिजन तुटवडय़ामुळे अनेक बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे काही प्रमाणात थांबावे म्हणून मनोज कापसे व मुन्ना धोंडगे यांनी देवळा येथील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन मशीन दिले. हे दोघे पिंपळगाव वाखारी येथील पोल्ट्री व्यावसायिक आहेत. या मशीनच्या माध्यमातून एका वेळेला पाच लिटर ऑक्सिजन तयार होत असल्याने गंभीर रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत दिलासा मिळणार आहे. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे उपस्थित होते.