गडचिरोलीत हाताच्या बोटावर मोजण्याइतके नक्षलवादी उरले – देवेंद्र फडणवीस

कुठल्याही परिस्थितीत गडचिरोली जिह्याला माओवादमुक्त करणारच, असे पुन्हा एकदा सांगताना आज जे काही बोटावर मोजण्याइतपत नक्षलवादी उरले आहेत, त्यांनीही मुख्यधारेत यावे, असे आज मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गडचिरोली येथे स्टील प्लांटचे भूमिपजून केल्यानंतर फडणवीस बोलत होते. जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचा विनाश न करता गडचिरोलीचा विकास करायचा आहे. या परिसरात एक कोटी रोपे लावली जाणार आहेत. त्यापैकी 40 लाख रोपे लावण्याचा आजच शुभारंभ केला जाणार आहे. कोणी विचारही केला नसेल तेवढा विकास येत्या काळात गडचिरोलीत बघायला मिळणार आहे, असे ते म्हणाले.

लोकांना भडकावणाऱ्यांना परदेशातून रसद

पोस्ट टाकून लोकांना भडकावणारे दोघे कोलकाता, तर दोघे बंगळुरूमध्ये बसून पोस्ट टाकत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यासाठी त्यांना परदेशातून फंडिंग केले जात होते. समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून संविधानाच्या विरोधात भडकवायचे, लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांना सोपवण्यात आले होते. गडचिरोलीत विकासाचा प्रकल्प आला तर सत्यानाश होईल, असा समज निर्माण केला जात होता, असेही फडणवीस यांनी नमूद केले.