विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, देवेंद्र फडणवीस यांचे सुतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

विधानसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने करण्याची आपली परंपरा आहे असे स्पष्ट मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. त्यामुळे मार्चमध्ये सुरु होणाऱया अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट होत आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. येत्या 1 मार्चपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले. अनेक मुद्यांवर विधानसभा अध्यक्ष निवड एकमताने होणार हे अवलंबून असते. तथापि यासंदर्भात मित्र पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही फडणवीस यांनी सांगितले.

शरजीतला सरकार वाचवतेय

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानीला राज्य सरकार वाचवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. वादग्रस्त वक्तव्य करूनही त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, हे सरकारच शरजीलचे आहे, असाही आरोप त्यांनी केला. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पेंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यासाठी किती आर्थिक तरतूद केली त्याची आकडेवारी त्यांनी यावेळी सादर केली.