
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध अशी व्यवस्था उभी केली आहे, तशीच राज्यानेदेखील करायला हवी. कोरोना संकटात आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयास भेट देऊन नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना कोरोना संकटात आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले.
राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव अशा प्रकारची अवस्था नाही. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितलं आहे की आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं, असे म्हणाले.




























































