
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका साक्षी प्रवीण वातकर (35) यांचे बुधवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. वातकर या गेली काही वर्ष आजारी होत्या. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना त्यांना देवगड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू,सासरे असा मोठा परिवार आहे.
साक्षी वातकर या प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आल्या होत्या. सतत हसतमुख, मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी 1 वा देवगड वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

























































