
कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात अवघड वळणावर मारुती इर्टिका कारला सायंकाळी 5 वाजता भीषण आग लागली. या भीषण आगीत इर्टिका कारमधील एक व्यक्ती जळाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कारचा MH07 AG – 6297 असा नंबर असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सदर कार ही कणकवली येथील वागदे गावातील एका उद्योजकाची असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. फोंडाघाट बाजारपेठ येथून 6 किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली आहे. खिंडी पासून जवळच या कारला आग लागली. या घटनेचे वृत्त समजताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


























































