सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने शनिवारी त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईन असे ते म्हणाले.

दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये, आपण स्वतः लवकरात लवकर कार्यकर्त्यांना येऊन भेटू, असे ते म्हणाले.