धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांची भेट घेतली.