सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारांसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.

जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या वेळीही त्यांनी मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःच याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.