
धारावी 90 फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सगळय़ांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले, मात्र या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले असून त्यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाने 12.30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.



























































