धक्कादायक! आईचा राग मुलीवर काढला, प्रेयसीच्या मुलीला जिवंत जाळले

मुंबईतील धारावी परिसरात एका नराधमाने त्याच्या प्रेयसीच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ती मुलगी 50 टक्के भाजली असून तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी नराधम नंदकिशोर पटेला अटक करण्यात आली आहे.

धारावी येथे राहणाऱ्या काजल जयस्वार (50) यांचे नंदकिशोर पटेल (42) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. जयस्वार यांचे पती व त्या विभक्त झालेल्या आहेत. काजल त्यांची मुलगी मोहिनी हिच्यासोबत धारावीतील गणेश चाळ येथे राहायच्या. काजल व नंदकिशोर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्या रागातून मंगळवारी रात्री नंदकिशोरने काजलच्या 20 वर्षीय मुलीवर टर्पेंटल ऑईल टाकून तिला पेटवून दिले. यात काजल 50 टक्के भाजली असून तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.