धारावीच्या पुनर्विकासासाठी नव्याने निविदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीच्या पुनर्विकासाची सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याच्या सचिव समितीने दिलेल्या शिफारशीला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. निविदा प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी याच्या अटी व शर्तींमध्ये बदल केले जाणार असून हे बदल मंत्रिमंडळ समितीच्या मंजुरीसाठी आणण्यात येणार आहे.

धारावी पुनर्विकासाबाबत 2 निविदाकारांच्या निविदा सचिव समितीसमोर ठेवण्यात आल्या. यामध्ये रेल्वेच्या जमिनीच्या हस्तांतरणाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला असता त्यावर महाअधिव्यत्त्यांचा अभिप्राय घेण्यात आला. यानुसार सचिव समितीने निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस मंत्रिमंडळाकडे केली. तिला आता मान्यता देण्यात आली आहे.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अधिकाधिक निविदाकार पुढे येऊन या प्रकल्पाला चालना मिळेल असे बदल निविदेच्या अटी व शर्तींमध्ये केले जाणार आहेत.