धुळे महापालिकेवर नागरिकांचा आक्रोश

685
dhule

शहरातील मिल परिसरातील असलेल्या घरांना महानगरपालिकेने तत्काळ नियमानुकूल करावे, तेथील नागरिकांना सातबारा उतारा तत्काळ द्यावा अशी मागणी करत आज येथील नागरिकांनी महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

धुळे शहरातील मिल परिसरात असलेल्या विखे नग, गुरुकृपा नगर, रासकर नगर, सीताराम माळीची चाळ, भडक चाळ, गोकुळ नगर, राम नगर, पिंजारी चाळ, हटकर वाडी, रंगारी चाळ, लीलाबाई चाळ, राऊळवाडी, तुळसाबाई मळा या परिसरांत 30 ते 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. सन 2002 पासून महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे सदर जागा मालकांकडून त्यावेळेस येथील नागरिकांना ही जागा खरेदी करता आली नाही. येथील काही रहिवाशांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्याकडून शक्य नाही म्हणून महापालिकेने तत्काळ या नागरिकांना नियमानुकूल करून त्यांना तत्काळ सातबारा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सातबारा नसल्याने अडचणी

मिल परिसरातील गुरुकृपा नगर, रासकर नगरसह या परिसरांतील नागरिकांची घरे नियमानुकूल नसल्याने त्यांना सातबारा उतारा मिळत नाही. सातबारा उतारा नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभही घेता येत नाही. महापालिकेतील सातबारा उतारा द्यावा. पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई आवास योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांना लाभ द्याका अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या