धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प; रस्त्यावरच साचले तळे, चौसाळ्याजवळची घटना

राज्यात सर्वत्र सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. नदी-नाले भरून वाहत आहेत. शेतात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. तसेच महामार्गाला नदीचे रुप आले आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चौसाळयाजवळ दोन कि.मी.अंतर एक लेन पूर्णपणे पाण्याने भरली आहे. त्या लेनवरून वाहतूक थांबविण्यात आली आहे.

रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी झाल्याने दुसर्‍या लेनने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. पाण्याला झिरपायला जागाच नसल्याने पाणी महामराग्वारच साचले आहे. पाण्याचा निचरा होऊन मार्ग मोकळा होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या लेनवरील वाहतूक ठप्प झाली आहे.