गोठवणाऱ्या थंडीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू, सहावा चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोठवणाऱ्या थंडीतून फ्रान्सवरुन लंडनला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर सहाव्याची स्थिती गंभीर आहे. फ्रान्सच्या समुद्री प्राधिकरणाने रविवारी सांगितले की, आतापर्यंत 30हून अधिक लोकांना वाचविण्यात यश आले आहे. 2024 मध्ये या मार्गावर स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

एएफपीच्या अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार स्थलांतरीतांचा रात्रीच मृत्यू झाला. तर पाचव्याचा मृतदेह नंतर समुद्रकिनारी सापडला. प्राधिकरणाने पुढे सांगितले की, ज्या समुहातील लोकांचा मृत्यू झाला ते विमेरेक्सच्या रिसॉर्ट शहराजवळ एका जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान त्यांची लहान होडी जवळपास 2 वाजता लाटांमध्ये अडकली. स्थानिक सरकारी वकिलाच्या यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की, होडी किनाऱ्यापासून दूर लोकांना उतरणार होती. पण त्याचवेळी पूर आणि वाढत्या लाटांमुळे ती पलटली.

सरकारी वकील कार्यालयाने सांगितले की, काही लोक आधीच जहाजावर होते आणि इतर जहाजावर जाण्याच्या तयारीत होते. कार्यालयाने सांगितले की, मृत्यू झालेले तरुण सीरियन असल्याचे समजते. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, एबेली नॉर्मंडी या फ्रेंच जहाजाचे चालक दल बचावासाठी गेले आणि त्यांना पाण्यात बेशुद्ध अवस्थेत सापडले. पाण्याचे तापमान सुमारे नऊ अंश सेल्सिअस असल्याचे अधिकार्याने सांगितले. एएफपीच्या पत्रकाराने विमेरेक्स तटबंदीजवळ स्थलांतरितांनी सोडलेले कपडे आणि शूज पाहिले. वाचलेल्यांना कॅलेसमधील आश्रयस्थानी नेण्यात आले. प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, 30 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, पहाटे 3 वाजता सुमारे 70 स्थलांतरितांना आणण्यात आले, ज्यात मुलांसह संपूर्ण कुटुंबे त्यापैकी काही अगदी लहान आहेत. कैलाइसजवळचे आसपासचे क्षेत्र इंग्लंडसाठी सगळ्यात छोटी सिमा पार करण्याचा जम्प ऑफ पॉईण्ट आहे. हा प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. समुद्री प्रांतानुसार 2023 चॅनल पार करायच्या प्रयत्नात प्रवाशांना जीव गमवावा लागला.