
नव्या वर्षात 1 जानेवारीपासून डिजिटल बँकिंगचे नियम बदलण्यात येणार आहेत. डिजिटल बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर सेवा देणारे प्लॅटफॉर्म होय. यामध्ये ट्रान्झॅक्शनची बँकिंग सर्व्हिस कर्ज, फंड ट्रान्सफर आणि बॅलेंस चेक, स्टेटमेंट डाउनलोड करणे यांचा समावेश आहे. नव्या नियमांतर्गत युजर्सला नोंदणीसाठी, बँकेचे नियम आणि अटी सोप्या शब्दांत सांगाव्या लागतील. यामध्ये फी, हेल्प डेस्कची माहिती, तक्रारी निवारण, डिजिटल बँकिंगसाठी सुरक्षितता आणखी सोपी करावी लागणार आहे. बँकांना सर्व फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी एसएमएस किंवा ई-मेल अलर्ट पाठवावे लागतील.



























































