गणेश मंडळांना देता येणार डिजिटल दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची पेमेंट्स आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने मुंबईतील 14 गणेश मंडळांसोबत करार केला आहे. त्यानुसार गणेशभक्तांना गणेशोत्सवादरम्यान पेटीएम क्यूआर कोड स्कॅन करत मंदिर ट्रस्टला दान करता येणार आहे.

प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरासह गिरगाव येथील गिरगावचा महाराजा, लालबाग येथील तेजुकाया मंडळ, अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा, मरोळ अंधेरी पूर्व येथील मरोळचा राजा, खेतवाडीमधील खेतवाडीचा राजा, परळ येथील परळचा इच्छापूर्ती लाल मैदान, लोअर परळ येथील फ्रेण्ड सर्कल मंडळ, लालबागमधील बालयुवक मित्र मंडळ, लोअर परळ जंक्शन येथील बालसाथी मंडळ, चेंबूर येथील सह्याद्री गणपती, पवई येथील पवईचा राजा, कांदिवली येथील महावीरनगर आणि ठाणे येथील ठाण्याचा महाराजा या गणेशमंडळांचा समावेश आहे.