
डायनाऊटने सहाव्या ग्रेट इंडियन रेस्टॉरण्ट फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि प्रतिक्षीत वार्षिक रेस्टॉरण्ट फेस्टिव्हल आहे. 20 शहरांमधील 10 हजार नामांकित रेस्टॉरण्ट्मसध्ये आजपासून 31 मार्च दरम्यान हा फेस्टिव्हल साजरा होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये रेस्टॉरण्टमधील बिलावर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. यात जे डब्लू मॅरियट, पिझ्झा हट, हिचकी, कॉपर चिमनी, चायना बिस्ट्रो, टोस्ट अँड टॉनिक, बाय द बे आदी रेस्टॉरण्ट चेन्स सहभागी होतील.






























































