दिग्दर्शक समीर विद्वांस करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’सारखे दर्जेदार चित्रपट मराठी प्रेक्षकांना देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस आता बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

समीर विद्वांस यांनी सोशल मीडियावरून आज आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सत्यनारायण की कथा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाक असून त्यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. ही म्युझिकल लव स्टोरी असून त्याची निर्मिती साजीद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत ‘‘एका नव्या प्रकासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्काद असू द्या,’’ असे समीरने ट्किटमध्ये म्हटले आहे. येत्या 1 जुलैला समीरची ‘समांतर-2’ ही केबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात स्कप्नील जोशी, तेजस्किनी पंडीत, नितीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही सिरीज एमएक्स प्लेअरवर पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या