शताब्दी, तेजसच्या रिकाम्या सीटस्च्या तिकिटांवर सवलत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

शताब्दी, तेजस, इंटरसिटी आणि डबलडेकर एक्सप्रेस यांच्यातील रिकाम्या सीटस्च्या तिकिटांवर लवकरच 25 टक्के सूट मिळणार आहे. रेल्वेला होणारे नुकसान टाळण्यासाठीच प्रशासनाचा हा नवा फंडा असल्याचे मानले जात आहे. मात्र ही सूट कोणत्या गाड्यांसाठी, कुठल्या क्लाससाठी आणि मुळात द्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रत्येक झोनमधील कार्यालयांमध्ये सर्क्युलर पाठवून कोणत्या एक्सप्रेसमध्ये रिकाम्या सीटस् आहेत त्याची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत द्यायला सांगितले आहे. प्रवाशांना ही सूट तिकिटांच्या मूळ भाडय़ावर दिली जाणार असून त्यावर जीएसटी, रिझर्व्हेशन फी, सुपरफास्ट टेरीफ आणि इतर चार्जेसही वसूल केले जाणार आहेत, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. सवलतीचे दर ठरवतानाच सीटस् रिकाम्याच राहणार नाहीत याबाबतही काही उपाययोजना करण्यासही रेल्वेने बजावले आहे.