द्रमुकचा पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चेन्नई

द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा आज विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांसमक्ष जाहीर करून टाकला.

द्रमुकच्या ‘अन्ना अरियावलम’ या मुख्यालयात एम. करुणानिधी यांच्या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. या समारंभाला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, भाजप नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, अभिनेते रजनीकांत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित होते.

तामीळनाडूच्या भूमीतून आपण पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव सुचवत आहोत, असे स्टॅलिन यांनी या समारंभावेळी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार आणि वर्तन एखाद्या राजासारखे आहे. त्यामुळे लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आपण सारे एकत्र आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत देशाला पंधरा वर्षे मागे ढकलले आहे. त्यांना आणखी पाच वर्षे मिळाली तर देश पन्नास वर्षे मागे जाईल.
-एम. के. स्टॅलिन, नेते, द्रमुक