
बऱ्याच जणांच्या घरातील फ्रिजमध्ये अंडी ठेवलेली असतात. कारण भूक लागल्यावर झटपट करता येणारा हा पदार्थ आहे. काही जणांच्या दिवसाची सुरुवातच ब्रेड ऑम्लेट किंवा उकडलेल्या अंड्याने होते. याकरिता जे लोकं दररोज अंडी खातात किंवा कच्च्या अंड्याचे सेवन करतात. ते लोकं दररोज अंडी बाहेरून विकत आणावी लागू नयेत यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवतात, मात्र अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य ? तसेच अंड खाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ? याबाबत जाणून घेऊया सेलिब्रिटी शेफ जेम्स मार्टिन यांचे मत.
– अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती फ्रेश राहतात असे आपल्याला वाटते, मात्र याचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी वापरू नयेत. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेलं अंड आणि फ्रिजबाहेर ठेवलेल्या अंड्याचा एखादा पदार्थ बनवल्यास हा फरक आपल्या लक्षात येईल. या दोन्ही अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या चवीमध्ये फरक जावणेल. त्यामुळे अंडी नेहमी साधारण तापमानात फ्रिजबाहेर ठेवायला हवीत.
– अंड्याच्या त्वचेमध्ये अनेक लहान छिद्रे असतात. त्यामुळे अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रीजमधील इतर उत्पादनांचा वास आणि चव शोषून घेतात, त्यामुळे अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांची खरी चव घ्यायची असेल तर अंडी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
अंडी खाण्यापूर्वी काय काळजी घ्याल ?
बरेच जण अंडी बाजारातून आणल्यावर न धुता तशीच उकडतात, असे कधीही करू नका. अंडी वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या. अंडी न धुता वापरल्यास अंड्याला चिकटलेले टाकाऊ पदार्थ पाण्यात जातात. त्यानंतर अंडी खाण्यापूर्वी सोलली असता ते टाकाऊ पदार्थ पाण्याद्वारे अंड्याला चिकटतात.
कच्चे अंड वापरणार असाल तर अंडी फोडताना त्याच्या सालीवरील जंतू त्यात मिसळू शकतात म्हणून अंडी वापरण्यापूर्वी नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने हलक्या हाताने धुवावीत.
अंड खाण्याचे फायदे ?
अंड अत्यंत पौष्टिक असून ते खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. अंड प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. ह्रदयाचे आजार दूर होण्याकरिता अंड्याची मदत होते. डोळ्यांकरिताही अंड खाल्ल्याने फायदे होतो. चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्याकरिता अंड्याची मदत होते. अंड्यामुळे अमिनो अॅसिड शरीराला मिळते. वजन नियंत्रणात राहायला मदत होते, अशा अनेक फायद्यांमुळे सेलिब्रिटी शेफ दररोज अंड खाण्याचा सल्ला देतात.






























































