
अंधेरी येथील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची देशातील टॉप 75 हृदयरोगतज्ञांमध्ये निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत हील फाऊंडेशन इनिशिएटिव्हने हृदयरोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या देशातील शेकडो डॉक्टरांचा सर्व्हे केला. त्या टॉप 75 डॉक्टरांमध्ये रत्नपारखी यांची निवड करून त्यांचा गौरव केला. डॉ. रत्नपारखी यांनी आजवर 25 हजारांहून अधिक हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचे ‘हसत खेळत हृदयविकार टाळा’ हे पुस्तक विक्रमी खपाचे ठरले आहे. रत्नपारखी सामाजिक कार्यातही अग्रेसर असून त्यांनी गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिह्यातील अनेक आदिवासी शाळा दत्तक घेऊन शेकडो विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.



























































