डॉक्टरांचा अनोखा कलाविष्कार, ‘द ब्रश मीट्स द लेन्स’चे आजपासून ऑनलाईन प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टर रुग्ण सेवा करत आहेत. या तणावाच्या काळात डॉक्टरांचे काही छंद, कला असतील तर त्यांना वाव देण्यासाठी त्यांच्या चित्रांचे, छायाचित्रांचे ‘ऑनलाईन’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्या 1 जुलै रोजी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

‘द ब्रश मीट्स द लेन्स’ असे या प्रदर्शनाचे नाव असून यात देशविदेशातील 27 डॉक्टरांचा सहभाग आहे. संजुक्ता अरुण यांच्या ला आर्टेमिसिया या वेब पोर्टलवर येत्या 31 जुलैपर्यंत प्रदर्शन बघता येईल. संजुक्ता या स्वत: उत्तम कलाकार, संग्राहक आहेत. रुटीनबाहेर पडून चित्रे रेखाटणाऱया किंवा हटके क्लिक करणाऱया डॉक्टरांचे वेगळे रूप समोर येईल आणि रसिकांना वेगळा अनुभव घेता येईल, असे संजुक्ता अरुण यांनी सांगितले. प्रदर्शनात अशोक कराड, इस्मत गबुला, देवयानी पारीख, अली तुंकीवाला, इयान डिसुजा, उदत्त खेर, अमेय पारेख, सुमेध पाचारणे, देवयानी वागळे, संजय कुलकर्णी, दीप्ती देसाई, श्रीराम उपाध्याय, अश्विन वैद्य, यतीन देसाई, साधना कला, नीरजा चंद्रा पीटर्स, सचिनदीप सिंघ, चंद्रिमा बॅनर्जी, भूपेंद्र मनोचा, सुष्मिता बॅनर्जी, सुसुप्ता चौधरी, जयाती सेन, शैलजा करकी, नारायण वेंकटरमण, मोहम्मद अली, प्रिया कृष्णमूर्ती, सुमोहन चटर्जी आदी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे.