
शासनाच्या आदेशाप्रमाणे डॉ. महेंद्रकुमार कुरा, प्राध्यापक त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभाग ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांची बदली करण्यात आली आहे. या आदेशानंतर मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई यांची भेट घेऊन आम्ही संप मागे घेत आहोत आणि कर्तव्यावर तात्काळ रुजू होणार आहोत, असे कळविले आहे.
डॉ. महेंद्रकुमार कुरा, प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांची बदली करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या आदेशान्वये महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणान्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) (दोन) मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारणास्तव डॉ. महेंद्रकुमार कुरा, प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्र या पदावर बदली करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या बदलीचे आदेश निघाल्यानंतर संप मागे घेत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.


























































