
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा समजला जाणारा धार्मिक उत्सव म्हणजे कुंभमेळा. धर्म आणि संस्कृती यांचा मिलाफ समजल्या जाणार्या या उत्सवाला जगभरातून अनेक भाविक, अभ्यासक भेट देतात. हा उत्सव विविध कारणांमुळे जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो.
The Kumbh Mela is the biggest spiritual celebration on Earth! Around 600 lakh people come here.
Witness the celebrations and uncover the secrets of this cultural phenomena in all its glory only on ‘Kumbh Mela’. Premieres 17th February ary at 9 PM on Sony BBC Earth.#FeelAlive pic.twitter.com/9T4YU6d3yA— Sony BBC Earth (@SonyBBCEarth) February 15, 2019
जगभरात औत्सुक्याच्या ठरलेल्या या कुंभमेळ्यासाठी युक्रेनमधूनही काही भाविक येतात. कुंभमेळ्यादरम्यान त्यांचं इथलं वास्तव्य, इथे येण्यामागची प्रेरणा, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे अनुभव मांडणारी मालिका सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीद्वारे येत्या रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित करण्यात येत आहे. हिंदू संस्कृतीचे प्रातिनिधिक रूप दर्शवणार्या या उत्सवातील अनोखे पैलू, अनाहत नाद आणि विस्तारलेलं धार्मिक स्वरूप या मालिकेत अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत.


























































