
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमधील नवादा जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या खाटांवर भटक्या कुत्र्यांनी डेरा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून बिहार सरकारच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढण्यात येत आहेत. याप्रकरणी बिहार आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहे.
Bihar: Dogs found sleeping on beds in Nawada government hospital. Umesh Chandra, Incharge, Civil Surgeon says, “We will ascertain how this happened and who’s responsible for it.” pic.twitter.com/jkUVZspkpA
— ANI (@ANI) January 16, 2019
नवादा जिल्हा रुग्णालयातील वॉर्डमधील सहा ते सात खाटांपैकी दोन खाटांवर कुत्रे झोपलेले आहेत. हे कुत्रे रुग्णालयात सर्रास फिरत असतात तसेच या कुत्र्यांमुळे रुग्णांना त्रास होत असल्याचे देखील समोर आले आहे. कुत्र्यांच्या त्रासामुळे रुग्णांना अनेकदा रुग्णालयाकडून बेडशीटही देण्यात येत नाही. तसेच हे कुत्रे रुग्णालयातच घाण करत असल्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य असल्याचा आरोप देखील रुग्णांनी केला आहे.




























































