
गरोदरपणात महिलांची विशेष काळजी घेतली जाते. आहारासह शारीरिक हालचाल महत्त्वाची असल्याने महिलांना सौम्य व्यायामाचा सल्ला दिला जातो. परंतु सोशल मीडियावर सध्या अमेरिकेतील एका गरोदर महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आठ महिन्यांची गरोदर असतानाही ही महिला चक्क हेवी वर्कआऊट करताना दिसतेय. मिलुटोनोविक असे या 34 वर्षीय महिलेचे नाव आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी काळजी व्यक्त केली असून या महिलेला स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.


























































