घरगुती कारणाने चिडलेल्या सुनेची सासऱ्याला बेदम मारहाण, सासऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षुल्लक घरगुती कारणावरून एका सुनेने आपल्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना बिहारमधील छपरा येथे घडली आहे. पिंकी देवी असं या सुनेचं नाव असून तिच्या सासऱ्याचं नाव रामनाथ प्रसाद असं आहे.

छपरा येथील साहेबगंज परिसरात पिंकी देवी (40) राहते. रामनाथ प्रसाद हे सैन्यातून निवृत्त झालेले 75 वर्षांचे गृहस्थ होते. ते पिंकी आणि त्यांच्या नातवासोबत राहत होते.

तिच्या घरात कूपनलिका बसवली आहे. पण पिंकी कुणालाही ती त्या कूपनलिकेतून पाणी भरू देत नसे. याच कारणावरून पिंकीचा रामनाथ यांच्याशी वाद झाला आणि तिने त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या रामनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, रामनाथ यांच्या मुलाने पिंकी हिचे मुस्लीम तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. आपल्या वडिलांनी तिला त्या तरुणासोबत रंगेहात पकडल्यामुळे ती चिडली होती. त्याचा सूड म्हणून पिंकीने दारू पिऊन रामनाथ यांची हत्या केली, असा आरोप पिंकीच्या नवऱ्याने केला आहे.