मी 7 महिन्यांत हिंदुस्थान-पाकिस्तानसह 7 युद्धे थांबवली, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80व्या सत्राला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्धविरामावर पुन्हा मोठे विधान केले आहे. जागतिक परिस्थिती चिंताजनक आहे. संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकही युद्ध थांबवलेले नाही. मी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला.

saamana.com/trump-announces-massive-h-1b-visa-fee-hike-to-100000-potentially-crushing-the-american-dream-for-thousands-of-indian-tech-professionals/

ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान अचानक टेलीप्रॉम्प्टर बंद झाला. यावरही ट्रम्प बोलले. आपल्याला यावर कोणताही आक्षेप नाही. टेलीप्रॉम्प्टर काम करत नसेल त्यावेळी आपण अधिक मनापासून बोलतो. जो कोणी तो टेलीप्रॉम्प्टर चालवत होता तो मोठ्या संकटात होता. पण जसे टेलिप्रॉम्प्टर खराब आहेत इतकेच वाईट संयुक्त राष्ट्रांचे कामकाज आहे, अशी टीका करत ट्रम्प यांनी आपले भाषण सुरू केले.

अमेरिकेला चीनचा काटशह; जागतिक प्रतिभेला संधी देण्यासाठी ‘के व्हिसा’ ची घोषणा

संयुक्त राष्ट्रांनी कोणतेही युद्ध थांबवलेले नाही. मी सात महिन्यांत सात युद्धे थांबवली. मी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले आणि अरब देशांमधील शत्रुत्व संपवले, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी गाझा आणि हमासलाही त्यांनी आवाहन केले. हमासने सर्व ओलिसांना सोडवे. तसेच हिंदुस्थान आणि चीनच्या धोरणांमुळे रशियाला निधी मिळत आहे. युरोपीय देशही रशियाला फंडिंग करत ​​आहेत. यावर मी आज युरोपीय नेत्यांशी चर्चा करेन, असे डोनाल्ड ट्रम्प रशियाबाबत म्हणाले. लोकांचा जीव वाचवणे हाच माझ्यासाठी नोबेल पुरस्कार आहे. अमेरिकेचा सुवर्णयुग सुरू आहे, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले.