
इस्लामिक दहशतवादाविरोधात हिंदुस्थानच्या हातात हात देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन व त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्रपतींवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या सभापती नॅन्सी पलोसी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे.
‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ट्रम्प यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात देऊन इस्लामिक दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार केला. त्यामुळे पाकडय़ांचा दहशतवाद ठेचला जाईल अशा हिंदुस्थानींच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच ट्रम्प यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात जो बिडेन हे रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर बिडेन पिता-पुत्राची भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमीर जेलेंस्की यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पलोसी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रम्प यांनी संविधानाचे उल्लंघन केले आहे. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असे सांगून पलोसी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी स्वतŠवरील आरोपाचा इन्कार केला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग
महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले गेले तर ती अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरेल, मात्र या प्रक्रियेला 20 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या एकाही राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या कारवाईला सामोरे जावे लागलेले नाही.




























































