ट्रम्प यांचे मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे हिंदुस्थानच्या दौऱ्यावर होते. मार्को रुबियो आणि पंतप्रधान मोदी यांची सेवा तीर्थ येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या वतीने मोदी यांना निमंत्रण दिले. दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, व्यापार, ऊर्जा, रणनीतीक यासह विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेदेखील उपस्थित होते.