
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला. जर रशियाने 50 दिवसांच्या आत युक्रेनसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही तर, त्यावर निर्बंध लादले जातील, असे ते म्हणाले. ओव्हल ऑफिसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी झालेल्या बैठकीत ट्रम्प म्हणाले की, युक्रेनला शक्य तितक्या लवकर शस्त्रे पाठवली जातील.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर नाराज आहे. मला वाटले होते की, आपण दोन महिन्यांपूर्वीच एक करार केला असता, पण तो झाला नाही. ट्रम्प यांनी पुतिन यांना एक कठोर माणूस असल्याचं म्हणत बोलले की, “त्यांनी क्लिंटन, बुश, ओबामा आणि बायडेन यांना मूर्ख बनवले, पण मला नाही.” ट्रम्प म्हणाले की, रशियाने 2022 मध्ये कोणत्याही चिथावणीशिवाय युक्रेनवर हल्ला केला होता आणि आता शांतता चर्चेदरम्यान त्यांनी हल्ले वाढवले आहेत.