गायींना ब्लँकेट दान करा आणि पिस्तुल लायसन्स मिळवा

739

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने थंडीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या गायींच्या सुरक्षेसाठी एक अनोखा आदेश जारी केला आहे. येथील स्थानिकांमध्ये असलेले पिस्तुल वेड बघून आधी गोशाळेतील दहा गायींना ब्लँकेट दान करा आणि पिस्तुल लायसन्स मिळवा असा आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. या आदेशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

शनिवारी ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी हा आदेश जारी केला. काही दिवसांपूर्वी चौधरी ‘गोला का मंदिर’ परिसरातील एका सरकारी गोशाळेत गेले होते. तेथे गेल्यावर कडाक्याच्या थंडीत गारठून सहा गायींचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहीले. त्यानंतर त्यांनी लाल टिपारा भागात ग्वाल्हेर नगर पालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या गोशाळेलाही भेट दिली. यावेळी तिथेही थंडीमुळे आजारी पडलेल्या गायी त्यांना दिसल्या. यामुळे गाईंच्या सुरक्षेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्याअंतर्गत त्यांनी नागरिकांना सुविधा हव्या असतील तर त्यांना काही गोष्टींचे पालन करावेच लागेल. असा आदेश जारी केला.

त्याआधी चौधरी यांनी एका गोशाळेला भेट दिली होती. त्यानंतर ज्यांना पिस्तुल लायसन्स हवयं त्यांनी वृक्षावरोपण करावे आणि त्या झाडाबरोबरचा एक सेल्फी पिस्तुल लायसन्ससाठी देण्यात येणाऱ्या अर्जाबरोबर जोडावा. त्याचबरोबर एक महिना त्या झाडाची देखभाल करावी असे निर्देर्शही चौधरी यांनी अर्जदारांना दिले होते.

 गोला मंदिर आणि लाल टिपारा येथील दोन गोशाळेत तब्बल आठ हजार गायी आहेत. हा भाग चंबळ क्षेत्रात येत असल्याने व स्थानिकांमध्ये पिस्तुल जवळ बाळगण्याची वृत्ती असल्यानेच त्यांना गायींना ब्लँकेट देण्याचा आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या