या कारणाने दिशा स्वतःला ऑनस्क्रीन पाहत नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिशय कमी वेळात दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. एम एस धोनी चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर बागी 2, भारतमध्येही तिने भूमिका बजावल्या होत्या. आपल्या फिटनेससाठी ती नेहमीच चर्चेत असते. परंतु स्वतःला तिला ऑनस्क्रीन पहायला आवडत नाही अशी कबुली खुद्द दिशाने दिली आहे.

दिशा म्हणाली की, “एकदा चित्रपटाचे काम संपले की मी त्यापासून दूर जाते. मी स्वतःला ऑनस्क्रीन पाहत नाही. त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं होतं.  एकदा का चित्रपटाचे शूटिंग संपले की मी त्याचा विचार करत नाही. ”

दोन तीन चित्रपट केले तरी दिशाला आपण इंडस्ट्रीमध्ये नवखे असल्याचे वाटते. इंडस्ट्रीत तुम्ही स्टार किड असाल तरच तुम्हाला संधी मिळत असे नाही. शाहरुख खान सारखा कलाकार ज्यांची काही ओळख नसताना किंग खान झाला असेही दिशाने यावेळी म्हटले.