डॉ. गिरीश ओक यांचे 50 वे नाटय़पुष्प! ‘38 कृष्ण व्हिला’ लवकरच रंगमंचावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी आपल्या अभिनय प्रवासात ‘साहेब विरुद्ध मी’, ‘मला काही सांगायचंय’, ‘कुसुम मनोहर लेले’ पासून ते अलीकडच्या ‘यू टर्न 2’, ‘वेलकम जिंदगी’ आदी नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे 50 वे नाटक  लवकरच रंगमंचावर अवतरणार आहे.

‘38 कृष्ण व्हिला’ या त्यांच्या नवीन नाटकाचा 19 मार्चला शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका-अभिनेत्री श्वेता पेंडसे दिसणार आहेत.