बेरोजगारीला नोटाबंदीच जबाबदार, डॉ. मनमोहन सिंग यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. केंद्रातील भाजप सरकारने कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच असंघटित क्षेत्रही मोडकळीस आले आहे, असे म्हणत काँग्रेस नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

केरळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडीजच्या व्हर्च्युअल संमेलनाचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर भाष्य केले.

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक करत असलेल्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नाही. त्यामुळे बेरोजगारी तसेच अन्य समस्या वाढत असल्याचे ते म्हणाले.