कोविड नियंत्रण – दहा कलमी कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • डॉ. प्रदीप आवटे

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून कोविड आजाराचे रुग्ण कमी होताना दिसत होते. त्यामुळे सर्वत्र एक मुक्ततेची भावना होती. आठ– नऊ महिन्यांपासून लॉक डाऊन आणि विविध बंधनांमुळे लोक स्वाभाविकच वैतागलेले होते. त्यामुळे ऑक्टोबरपासून अगदी जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक कमी होताना पाहून हे संकट आता संपले आहे अशी भावना अनेकांच्या मनामध्ये होती. तथापि जानेवारीच्या मध्यानंतर अनेक जिह्यांमध्ये आणि विशेषतः विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या जिह्यांमध्ये कोरोना आजाराने परत तोंड वर काढलेले दिसत आहे ही कोरोनाची दुसरी लाट म्हणावी का, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. याची नेमकी कारणे काय आहेत ? कोरोना विषाणू बदलला आहे का ? या भागांमध्ये नवीन स्ट्रेन आला आहे की काय, अशी एक ना अनेक कारणे आणि चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत.

विषाणू बदलला आहे का? विषाणू आपली जनुकीय रचना बदलतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला काही वेळा नवे गुणधर्म प्राप्त होऊ शकतात. काही वेळा हे बदल विषाणू प्रसारास सहाय्यभूत ठरतात. काही विशिष्ट बदलांमुळे विषाणू मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर हल्ला करेल याचे स्वरूपदेखील बदलू शकते. तसेच विषाणूच्या घातकतेमध्येदेखील बदल होऊ शकतात. सध्या जगभरात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील देशातील विषाणू बदलाची चर्चा सुरू आहे. आपण या जनुकीय रचनेचाही नियमित अभ्यास देशातील दहा प्रयोगशाळांच्या मदतीने करतो आहोत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ही विषाणू बदलामुळे झालेली नाही असे सध्या तरी दिसते आहे.

हे आहेत आकडे राज्यातील कोविडच्या रोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांचे ! अवघ्या चाळिसेक दिवसांत आपण तीन हजारांवरून तेरा हजारांचा आकडा गाठला आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून कोविड आजाराचे रुग्ण कमी होताना दिसत होते. त्यामुळे सर्वत्र एक मुक्ततेची भावना होती. आठ-नऊ महिन्यांपासून लॉक डाऊन आणि विविध बंधनांमुळे लोक स्वाभाविकच वैतागलेले होते. त्यामुळे ऑक्टोबरपासून अगदी जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक कमी होताना पाहून हे संकट आता संपले आहे अशी भावना अनेकांच्या मनामध्ये होती. तथापि जानेवारीच्या मध्यानंतर अनेक जिह्यांमध्ये आणि विशेषतः विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या जिह्यांमध्ये कोरोना आजाराने परत तोंड वर काढलेले दिसत आहे ही कोरोनाची दुसरी लाट म्हणावी का, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. याची नेमकी कारणे काय आहेत ? कोरोना विषाणू बदलला आहे का ? या भागांमध्ये नवीन स्ट्रेन आला आहे की काय, अशी एक ना अनेक कारणे आणि चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत.

कोविड रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होण्याची कारणे आपण जेव्हा शोधू लागतो तेव्हा साधारणपणे तीन ते चार ठळक कारणे आपल्या समोर येतात. यातील पहिले कारण हे वातावरणाशी संबंधित आहे. मागील तीन-चार आठवडय़ाच्या काळामध्ये उत्तर हिंदुस्थानमध्ये थंडीची लाट आलेली आपण पाहिलेली आहे. या थंडीच्या लाटेचा अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्याही हवामानावर झालेला दिसून येतो. विदर्भासह अनेक जिह्यांमधील किमान तपमान मागील काही दिवसांमध्ये पाच ते सात डिग्री सेल्सियसने कमी झालेले आपण पाहिलेले आहे. हिवाळ्यातील वातावरण हे नेहमी हवेवाटे पसरणाऱ्या स्वाईन फ्लू किंवा कोरोनासारख्या विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असते. त्यामुळे या वातावरणाचा हातभार या वाढीस निश्चितपणे लागला आहे असे दिसते. यासोबतच ऑक्टोबरपासून कोरोना आजाराचा उतरता आलेख लक्षात घेऊन आपण आपले सामाजिक आणि आर्थिक जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी एक-एक बाब टप्प्याटप्प्याने अनलॉक करतो आहोत आणि ते आवश्यकही आहे. जानेवारीच्या मध्यावर आपण राज्यातील 14 हजारांहूनही अधिक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घेतल्या. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. स्वाभाविकपणे गावपातळीवरील या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिह्यांमध्ये काम करणारी, नोकरीधंद्याच्या निमित्ताने परगावी राहणारी गावकरी मंडळी काही दिवसांकरिता आपापल्या गावी गेली आणि आली. या सगळ्यामुळे मोठी सामाजिक सरमिसळ झाली यात काहीच शंका नाही. निवडणुकीचा प्रचार, सभा, मीटिंग या सगळ्यांमध्ये लोक कोविड प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक असणारी सूत्रे बिलपूलच विसरून गेले होते. त्यामुळे अशा भागांमध्ये रुग्णसंख्या वाढताना सध्या आपण पाहतो आहोत. रुग्णवाढीचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लग्न किंवा इतर कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रम पुन्हा कोविडपूर्व उत्साहाने पार पडू लागले आहेत. चार-पाचशे तर सोडा, हजार लोकांपेक्षाही अधिक गर्दीची लग्नं होताना आपण अनेक ठिकाणी पाहिले आहे. कोविड प्रसार टाळण्यासाठी कोणतीही काळजी न घेता अशा समारंभात सहभागी होणारे तुम्ही आम्ही सगळे एक प्रकारे आपापल्या भागात या आजाराच्या वाढत्या संख्येस कारणीभूत आहोत हे नाकारता येणार नाही. सध्या रुग्णवाढ दिसत असली तरी मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे हे महत्त्वाचे आहे, पण म्हणून आपण या वाढीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेही तेवढेच खरे.

आपण या साऱ्या गोष्टी सांभाळल्या तर हा आजार पुन्हा कमी होईल. गरज आहे ती आपण जबाबदारीने वागण्याची! कारण लॉक डाऊन हे काही या आजारावरील कायमस्वरूपी उत्तर नाही. ते केवळ पॉज बटन आहे. महामारीच्या सुरुवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा – रुग्णालये सुसज्ज करण्याकरिता वेळ मिळावा म्हणून लॉक डाऊन महत्त्वाचे होते. ते पुनः पुन्हा लागू करणे योग्य नाही. गरज आहे सगळ्या गोष्टी सुरू असतानाही आपण खबरदारी पाळण्याची. स्वतःवर काही आवश्यक बंधने घालून घेतली तर लॉक डाऊन न करताही  आपल्याला कोविडचा बंदोबस्त करता येईल आणि आता तर आपल्या मदतीला लसदेखील आली आहे. ज्यांचे वय 45 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांना काही अतिजोखमीचे आजार आहेत, त्या व्यक्तींमध्ये कोविडची गुंतागुंत अधिक दिसून येते हे आता आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे समाजातील या घटकाने लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे. लॉक डाऊन न करताही कोविडसोबत जगायला शिकणे आता आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे.

कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी दहा कलमी कार्यक्रम  –

एकूण काय विषाणू बदललेला असला किंवा नसला तरी तुमच्या माझ्यासाठी कोरोना टाळण्याचे साधेसोपे उपाय मात्र बदललेले नाहीत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.  कोरोना आपल्यापर्यंत  आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी वापरायचा  दहा कलमी कार्यक्रम  अगदी सोपा आहे. हा टेन पॉइंट कार्यक्रम आपल्याला थोडक्यात असा सांगता येईल–

  • समूहात असताना मास्क वापरा.
  • साबण – पाणी / सॅनिटायझरच्या मदतीने हातांची स्वच्छता राखा.
  • प्रत्येक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचे अंतर ठेवा.
  • अगदी गरज असेल तेव्हाच प्रवास करा. अनावश्यक प्रवास टाळा.
  • कौटुंबिक कार्यक्रम, समारंभ साध्या पध्दतीने आणि गर्दी टाळून साजरे करा. अशा कार्यक्रमात कोविडअनुरूप वर्तनाचा अवलंब करा.
  • स्वतःला किंवा घरातील कोणाला फ्लूसारखी लक्षणे असतील ती लपवू नका. वैद्यकीय सल्ल्याने कोविड चाचणी करून घ्या.
  • ज्या व्यक्तींचा जनसंपर्क अधिक आहे (सुपरस्प्रेडर) त्यांनी कोविडअनुरूप वर्तन ठेवणे आवश्यक आहे आणि स्वतःला फ्लूसारखी लक्षणे असतील तर तातडीने आरोग्य विभागास अवगत करून टेस्ट करून घेणे आणि विलग होणे गरजेचे आहे.
  • जे कोविड रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत त्यांनी विलगीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. आपल्या घरात पुरेशी जागा नसेल तर घरगुती विलगीकरणाचा आग्रह धरू नये.
  • ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग आणि अशा स्वरूपाचे आजार आहेत आणि ज्यांचे वय 60 पेक्षा अधिक आहे, त्यांनी आपला जनसंपर्क कमी करणे आणि लक्षणे असल्यास अजिबात उशीर न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाने आपल्या संपका&त आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला तातडीने द्यावी. त्यामुळे या व्यक्तींचा शोध घेऊन आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होते.

(लेखक एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्रचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

Email – [email protected]