
ड्रीम स्पोर्ट्सचा परोपकारी हस्त असलेल्या देशातील स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी कंपनीपैकी एक ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशन (DSF), ने सहा उत्कृष्ट फूटबॉलपटूंना सहाय्य करण्यासाठी बायचुंग भुतिया फूटबॉल स्कूल (BBFS) रेसिडेंशियल अकॅडमीच्या भागीदारीत ‘डेयर टू ड्रीम’ उपक्रमाची सुरूवात केली. BBFS ची सहकारी असलेल्या इंडियन फूटबॉल फाऊंडेशनने निवडलेल्या या युवा खेळाडूंचे वय 12 ते 17 वर्षांदरम्यान आहे आणि ते मणिपूर, मेघालय आणि उत्तराखंड या आव्हानात्मक पार्श्वभूमी मधून आलेले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून, DSF त्यांना पुढील एक वर्षासाठी त्यांचे शिक्षण, पालन-पोषण आणि स्पर्धात्मक प्रदर्शन यांसाठी प्रशिक्षण आणि सखोल सहाय्य देणार आहे.
या भागीदारीबद्दल बोलतांना, माजी हिंदुस्थानच्या फूटबॉल संघाचा कर्णधार आणि या शाळेचे संस्थापक बायचुंग भुतिया म्हणाले, “ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या भागीदारीने आम्ही फार उत्साही आहोत. देशातील प्रत्येक फूटबॉल खेळणाऱ्या मुलाला समान संधी मिळून DSF च्या सहाय्याने तो बळकट व्हावा हे आमचे ध्येय आहे. अनुभवी प्रशिक्षक आणि क्रीडा व्यावसायिक यांच्या रचनात्मक मार्गदर्शनामुळे प्रज्ञावंत युवा खेळाडूंना भारताचे भविष्यातील फूटबॉल पटू बनण्यात मदत होऊ शकते याबद्दल आम्हाला फार आत्मविश्वास आहे. “
‘डेयर टू ड्रीम’ उपक्रमाबद्दल बोलतांना, ड्रीम स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-अध्यक्ष भावित सेठ म्हणाले, “युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या जिद्दीमध्ये सहभाग घेणाऱ्या बायचुंग भुतिया फूटबॉल स्कूलच्या भागीदारीचा आम्हाला अभिमान आहे. या भागीदारीमधून, आम्ही निष्णात युवा खेळाडूंची पारख करून त्यांच्याकडून खेळाची तयारी करून घेऊ. खेळासोबत शरीर आणि मनाच्या तंदूरुस्तीसाठी मेहनत घेऊ. कुठल्याही प्रकारे सहाय्य करण्यास काहीही कमतरता ठेवणार नाही.” अधिक माहितीसाठी, भेट द्या www.dsf.org.in




























































