दिवसा कपड्याचा व्यापारी, रात्री ड्रग्जची तस्करी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

हिंदुस्थानात येऊन कपडा व्यापारी म्हणून दिवसा काम करून रात्रीच्या अंधारात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अडीच लाखांच्या कोकेनसह रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून 50 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

कोपरखैरणे येथे कपड्याचा व्यापार करणारा आणि तेथेच राहणारा एक नायजेरियन तरुण कोकेनची डिलेव्हरी देण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावरून शिवडी परिसरात येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन कदम, मोरे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून उचेना ओवील (32) या तरुणाला तेथे 50 ग्रॅम कोकेनसह रंगेहाथ पकडले.

दिवसा तो कोपरखैरणे येथे कपड्याच्या व्यापारी म्हणून वावरतो आणि रात्रीचा ड्रग्जची तस्करी करतो. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध घेत असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

summary- drug peddler got arrested