नायजेरियन ड्रग्ज माफिया दीड कोटीच्या कोकेनसह सापडला; आझाद मैदान युनिटची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने आग्रीपाडा येथे धडक कारवाई केली. नशेबाजांसाठी कोकेनचा साठा घेऊन आलेल्या एका नायजेरियन ड्रग्ज माफियाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दीड कोटी किमतीचे 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

आग्रीपाडा येथील पालिका शाळेजवळ असलेल्या लाल मैदानात एक नायजेरियन तरुण कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची खबर आझाद मैदान युनिटचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय मसवेकर यांना मिळाली. त्याआधारे मसवेकर यांनी उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पथकासह सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन ड्रग्ज माफिया तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या अंगझडतीत तब्बल 500 ग्रॅम कोकेन साठा मिळाला. चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को (35) असे त्या तस्कराचे नाव असून तो हा कोकेन साठा कोणाला विकणार होता याचा पोलीस तपास करीत आहेत.