गोव्यात 3 कोटींच्या ड्रग्ससह नायजेरियन आरोपीला अटक!

377

उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी ऊर्फ आलेक्स याला अटक करून सुमारे 3 कोटींचे ड्रग्स जप्त केले. यात कोकेन, एमडीएमए, अँफेटॅमिन, चरस, गांजा व रोख 2 लाख रुपयांचा समावेश आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 29 रोजी सीमेर-कांदोळी येथे संशयित राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत कळंगुट पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी नायजेरियन नागरिक इफियानी पास्कोल ओबी ऊर्फ आलेक्स (34) याला अटक करून त्याच्याकडून 1.021 किलो कोकेन, 2.035 किलो एमडीएमए, 760 ग्रॅम अँफेटॅमिन, 106 ग्रॅम चरस, 1. 270 किलो गांजासह रोख 2 लाख जप्त केले. हस्तगत केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 3 कोटी आहे. संशयित आलेक्सला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या