
कामाच्या वेगाबरोबर वेळेची बचत तसेच पेपर गहाळ होऊ नये, यासाठी पेपरलेस व्यवहार करणारे दुबई हे जगातील पहिले शहर ठरले आहे. यामुळे 35 कोटी अमेरिकन डॉलर्स आणि 14 कोटी तासांची बचत होणार आहे. दुबई शहरातील सर्व सरकारी व्यवहार हे आता 100 टक्के डिजिटल झाले आहेत, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दुबईमध्ये सलग पाच टप्प्यांत पेपरलेस योजना राबवण्यात आली. प्रत्येक टप्प्यात सरकारच्या विविध गटांचा समावेश करण्यात आला होता.


























































